iOS यूझर्सना वापरता येणार नाही ट्विटर!

iphone
सॅन फ्रान्सिस्को – iOS ९ (ऑपरेटिंग सिस्टम)वर आधारित आयफोन व आयपॅड युझर्सना यापुढे ट्विटरचा वापर करता येणार नाही. फक्त iOS १० किंवा यापेक्षा सरस ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या फोनवर ट्विटर अॅप वापरता येणार आहे.

आतापर्यंत ट्विटरचा वापर आयफोन ४, आयफोन ५, आयफोन ६ या फोनमध्ये करता येत होता. पण या फोनमध्ये यापुढे ट्विटरच्या अपडेट व्हर्जनचा वापर करता येणार नाही. कुठल्याही अॅपकडून ऑपरेटिंग सिस्टमची पात्रता ठेवण्याची पहिली वेळ नाही. लिंक्डइन आणि स्नॅपचॅटसारखे अॅप्स फक्त iOS १० असणाऱ्या फोनवरच वापरता येते. शिवाय फेसबुक अॅपसुद्धा iOS ९ किंवा यापेक्षा सरस ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या फोनवर वापरता येते.

Leave a Comment