फेसबुकने डिलीट केली 400 पेक्षा अधिक अॅप

facebook
वापरकर्त्यांच्या गोपनीय माहितीचा माहितीचा दुरुपयोग करण्याच्या संशयावरून 400 पेक्षा अधिक अॅप निलंबित केल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. लोकांची माहिती चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येत आहे का याची कंपनीने चौकशी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

“हे ॲप विकसित करणाऱ्या डेव्हलपर्सबाबत असलेला संदिग्धपणा तसेच या ॲपवर घेतली जाणारी माहिती यामुळे ही अॅप निलंबित करण्यात आली,” असे कंपनीचे उपाध्यक्ष इमे आर्चिबाँग यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये जाहीर केले.

“आम्ही विविध ॲपची चौकशी चालू ठेवू आणि आवश्यक असतील ते बदल करू जेणेकरून लोकांच्या माहितीचे संरक्षण होईल,” असेही आर्चिबाँग यांनी लिहिले आहे.

मार्च महिन्यात केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने वापरकर्त्यांच्या माहितीचा दुरुपयोग केल्याचे प्रकरण समोर आले होते. या कंपनीने सुमारे आठ कोटी 70 लाख वापरकर्त्यांची माहिती वापरण्याचा संशय आहे. या प्रकरणावरून विविध देशांतील सरकारांनी फेसबुकच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. यासंबंधात मे महिन्यात फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने क्षमायाचना केली होती आणि हे सोशल नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते.

Leave a Comment