गुगलचे सर्च इंजिन होणार अपग्रेड

google
सॅन फ्रान्सिस्को – जाएंट सर्च इंजिन असलेल्या गुगल इंजिनमध्ये देण्यात येणाऱ्या जी सूट अॅप्लिकेशन्सची वाढ करण्यात येणार असून हा सकारात्मक बदल युझर्संना अधिक सुविधा मिळावी, या हेतूने करण्यात येणार आहे.

युझर्सच्या सोयीकरीता साईड पॅनला गुगलने उत्तम दर्जाचे बनवले असून एकाचवेळी एकापेक्षा जास्त काम यामध्ये सहज करता येणार आहेत. म्हणजेच तुम्हाला जी-मेल इनबॉक्स मिनीमाइझ करून इतर जी सूट अॅपचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही करत असलेले काम अर्ध्यावर राहिल्यास त्या कामाची आठवण करून देणार आहे. नवीन फिचरच्या माध्यमतून युझर्संना डोक्ससहित शीट, स्लाइड आणि ड्रॉईंगचा वापर करता येणार आहे. गुगलकडून करण्यात आलेला बदल युझर्संना नक्कीच आवडेल शिवाय यामुळे त्यांच्या कामात मदत होणार आहे. पुढील पंधरा दिवसात हा बदल सर्व युझर्संना अनभवता येणार असल्याचे गुगलकडून म्हटले गेले आहे.

Leave a Comment