शासकीय विमा सुरु करणारी एअरटेल पेमेंट बँक भारतातील पहिली बँक

airtel
नवी दिल्ली – एअरटेल पेमेंट बँकेने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी पाऊल उचलले असून एअरटेल पेमेंट बँकेने त्यासाठी भारती अॅक्सा लाइफ इन्शुरन्ससोबत करार करण्यात आला आहे.

यामध्ये ग्राहकाला वार्षिक ३३० रुपयांच्या प्रिमीयममध्ये २ लाखांचा विमा दिला जातो. एअरटेल पेमेंट बँक शासकीय विमा सुरु करणारी भारतातील पहिली बँक ठरली आहे. देशभरातील ५० हजारांपेक्षा जास्त एअरटेल पेमेंट बँकेत ही योजना उपलब्ध असणार आहे. हे पाऊल आर्थिक समावेशन वाढविण्याच्या दृष्टीने आणि विमा पॅलिसीची माहिती नसणाऱ्या नागरिकांसाठी उचलण्यात आले आहे. एअरटेल नेटवर्कचा विस्तार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असल्याने ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचेल.

Leave a Comment