अवघ्या ४ हजारात लावाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन

LAVA
नवी दिल्ली – “लावा Z60s” हा नवीन स्मार्टफोन लावा इंटरनॅशनल कंपनीकडून बाजारात दाखल करण्यात आला असून ४ हजार ९६० रुपये ऐवढी या फोनची किंमत असून आतापर्यंतचा कंपनीचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

या फोनमध्ये ५ इंच एचडी डिव्हाइस, १ जीबी रॅम आणि १६ जीबी इन्टर्नल स्टोरेजसह १.५ गिगाहर्ट्झ क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये अॅन्ड्रॉईड ८.१ ओरिओ (Go Edition) आणि २५०० एमएएच बॅटरी चालते. ५ मेगापिक्सल ऑटो-फोकस रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा “Z60s” फोनमध्ये आहे.

या फोनबाबत लावा इंटरनॅशनल कंपनीचे गौरव निगम यांनी सांगितले, की ग्राहकांकडून आम्ही वेळोवेळी अभिप्राय घेऊन हा फोन तयार केला असल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस हा फोन नक्कीच उतरेल. रिलाईन्स जिओसोबत कंपनीने भागीदारी केली असून ग्राहकांना ४जी स्मार्टफोन सेवेसाठी विशेष कॅश बॅकच्या ऑफर्स दिल्या आहेत.

Leave a Comment