बाल्मोरल येथे सुट्टीवर गेल्यानंतर अशी असते राणी एलिझाबेथची दिनचर्या

barmol
दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी ब्रिटनची राणी एलिझाबेथ, तिच्या वार्षिक सुट्टीसाठी स्कॉटलंडच्या उत्तरी भागामध्ये असलेल्या तिच्या बाल्मोरल कासल मध्ये जात असते. ही परंपरा गेली अनेक दशके सुरू आहे. काही आठवड्यांच्या सुट्टीच्या या काळामध्ये राणी एलिझाबेथची दिनचर्या अतिशय साधी आणि कमी धावपळीची, विश्रांतीची असते. स्कॉटलंड येथे असलेले विशाल बाल्मोरल कासल हे राणीचे आवडते निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. दर वर्षी उन्हाळ्याच्या ऋतूतील शेवटचे काही दिवस राणी एलिझाबेथ आपल्या परिवारासमवेत येथे घालविणे पसंत करते. सुट्टीसाठी बाल्मोरल कासलमध्ये आल्यानंतर राणी एलिझाबेथ अतिशय आनंदी रहात असल्याचे तिचे परिवारजन म्हणतात.
barmol1
बाल्मोरल कासलमधले हे दिवस औपचारिक जबाबदाऱ्या, आणि एरव्हीच्या दगदगीच्या आयुष्यापासून काही काळाकरिता का होईना, पण विश्रांती देणारे असतात. हा वेळ राणी आपल्या परिवारजनांकरिता राखून ठेवत असते. यंदाच्या वर्षी शाही परिवाराची नवी सदस्य मेघन मार्कल ही देखील बाल्मोरल कासलमध्ये काही काळ वास्तव्य करणार असल्याचे समजते. या भव्य इमारतीभोवती प्रचंड मोठी हिरवी गार कुरणे आहेत. या कुरणांवर, निसर्गाचा आनंद घेत दूरवर मारलेले फेरफटके, घोडेस्वारी, सहली यांचा एकत्रितपणे आनंद, शाही परिवाराचे सदस्य या काळामध्ये घेत असतात.
barmol2
या काळादरम्यान राणी एलिझाबेथला देखील सर्वसामन्यांप्रमाणे आयुष्याचा आनंद घेण्यास आवडते. दुपारचे भोजन बाहेर बागेमध्ये निसर्गाच्या सोबतीने केले जाते. या वेळी एरव्ही असणारा शाही मेजवान्यांचा थाट नसतो. राणी एलिझाबेथ नव्वदीमध्ये असूनही स्वतः गाडी चालवत लांबवर फेरफटका मारून येणे पसंत करते, तर तिचे पती प्रिन्स फिलीप संधी मिळाली की स्वतःच्या हाताने बागेमधील ग्रीलवर निरनिराळे पदार्थ बनवून ते सर्वांना प्रेमाने खाऊ घालत असतात. इतकेच काय, तर भोजन आटोपल्यानंतर राणी एलिझाबेथ स्वतः सगळ्यांच्या प्लेट्स उचलून, त्या धुवूनही टाकते. बाल्मोरल कासलमधील शाही परिवाराचा हा सुट्टीचा काळ त्यांना खऱ्या अर्थाने ‘रीचार्ज’ करीत असतो.

Leave a Comment