२७७ वर्ष जुनी घंटा चीनमधील एका खेड्यात सापडली

bell
शिजीयाझुआंग – २७७ वर्ष जुनी लोखंडी घंटा चीन येथील हेबेई प्रांतातील एका खेड्यात सापडली असून याबाबतची माहिती सांस्कृतिक अवशेष विभागाने दिली आहे.

२०० किलो घंटेचे वजन तर १ मीटर उंची आहे. २ सेमी तिची जाडी तर ८० सेमी व्यास आहे. दोन भागात ही घंटा विभागलेली असून वरील भागात साम्राज्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणारे आठ वर्ण तसेच मुकुट घातलेला राजकुमार कोरलेला आहे. घंटेच्या इतिहासासंबंधित माहिती देणारे ३००पेक्षा जास्त दगडी शिलालेख खालील भागात आहेत.

याबाबत माहिती देताना सिझिअन देशाचे सांस्कृतिक अवशेष तज्ज्ञ म्हणाले, की जुना इतिहास या घंटेला लाभलेला असून ही घंटा सर्वप्रथम संदेश देण्यासाठी वापरण्यात आल्यानंतर याचा उपयोग एक संगीत वाद्य म्हणून करण्यात आला. घंटेसंबंधित नवीन शोध हेबेईच्या दाक्षिणात्य भागातील धर्म, प्रथा तसेच धातू उद्योगाच्या विकासाबद्दल माहिती मिळवण्यास उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

Leave a Comment