आता जुने सामान विकणार फ्लिपकार्ट

flipkart
मुंबई : देशातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेल कंपनी फ्लिपकार्टने नुकतीच महत्वाची घोषणा केली असून जुन्या सामानाला फ्लिपकार्ट आता नवे करून विकणार आहे. त्यांनी यासाठी एक वेबसाइट लाँच केली आहे. ‘टू गूड’ (2GUD) ज्याचे नाव आहे. या वेबसाइटवर सुरूवातीला जुने इलेक्ट्रिक सामान विकले जाणार आहे. कंपनी ज्यासोबत गुणवत्तेचे सर्टिफिकेट देखील देणार आहे. यातील वस्तू या कमी दरात दिल्या जाणार आहेत.

आता या स्टोरमध्ये जुने मोबाइल फोन, लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि टॅबलेट सारख्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत. याबाबत कंपनीने सांगितले आहे की, फ्लिपकार्टच्या या नव्या स्टोरमध्ये येणाऱ्या काही दिवसांत स्पीकर, पावर बँक, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, टीव्ही सेट आणि त्यासारखे ४०० हून अधिक प्रोडक्ट उपलब्ध होणार आहे.

असे म्हटले जाते आहे की, या नव्या वेबसाइटवर वस्तूंना ८० टक्के स्वस्त दरात मिळणार आहे. या नव्या संकेतस्थळाला छोट्या शहरांकडून अधिक आशा आहेत. त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळेल असा त्यांचा विचार आहे. ज्या शहरात लोकांची नवीन वस्तू खरेदी करण्याची ताकद नाही पण त्यांना याचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

Leave a Comment