आपल्या बॅकअप पद्धतीत मोठा बदल करण्याच्या तयारीत व्हॉट्स अॅप

whatsapp
नवी दिल्ली – तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या व्हॉट्स अॅप लवकरच आपल्या युजर्सचा डेटा डिलीट करणार असून तुमचे मेसेज(चॅटिंग), फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सचा यामध्ये समावेश असल्यामुळे तुम्हाला आतापर्यंतचा डेटा हवा असल्यास १२ नोव्हेंबरपूर्वी बॅकअप घ्यावा लागणार आहे. कारण आपल्या बॅकअप पद्धतीत मोठा बदल करण्याच्या तयारीत व्हॉट्स अॅप आहे.

आता तुमच्या डिव्हाइसवर व्हॉट्स अॅपमधील डेटा गुगल ड्राइव्हवर सेव्ह होईल. हा निर्णय व्हॉट्स अॅप आणि गुगलमध्ये झालेल्या डीलनंतर घेण्यात आला आहे. अनेकदा मेसेज बॅकअप घेण्यासाठी व्हॉट्स अॅपकडून तुम्हाला विचारणा झाली असेल किंवा ऑटोमॅटीक बॅकअपचा पर्याय समोर आला असेल. आतापर्यंत युजर्सचा डेटा व्हॉट्स अॅप फोनच्या मेमरीमध्ये सेव्ह करत होता, त्यामुळे फोनची मेमरीही लवकर भरली जायची. पण हा बॅकअप आता गुगल ड्राइव्हवर सेव्ह होईल. व्हॉट्सअॅप यूझर्सना आपल्या अकाऊण्टमधील डेटा गुगल ड्राईव्हमध्ये साठवू देण्यास गुगलने मान्यता दिली आहे.

नोव्हेंबरमध्ये व्हॉट्स अॅप याबाबत नवे अपडेट जारी करणार असल्यामुळे १२ नोव्हेंबरपूर्वी आपण आपल्या व्हाट्स अॅपचा डेटा घेऊन ठेवला आहे का याची खात्री करा. जर बॅकअप घेतला नसेल तर वेळीच बॅकअप घ्या कारण त्यानंतर तुमच्याकडे काहीही पर्याय उपलब्ध नसेल.

Leave a Comment