सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

social-media
लखनऊ : उत्तर प्रदेशातील पोलीस मॉब लिंचिंगच्या अनेक घटनांनंतर अधिक सतर्क झाले असून अफवा किंवा धार्मिक हिंसाचार सोशल मीडियावर पसरवण्याच्या प्रयत्नाखाली आता तुम्हाला ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’खाली (रासुका) अटकही होऊ शकते. रासुका अंतर्गत आरोपींविरोधात कारवाई केली जाऊ शकते.

याबाबत लखनऊच्या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर या कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल. आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध करणे, आक्षेपार्ह टीका करणे, कमेन्ट करणे… किंवा अशा आक्षेपार्ह घटनांना सोशल मीडियावर प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या फॉरवर्ड करणे यासाठीही ही कारवाई केली जाणार आहे.

सोशल मीडियाचा वापर करत गेल्या काही दिवसांपासून धार्मिक भावना भडकावण्याचा वारंवार प्रयत्न केला गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. आपल्या सायबर सेलच्या साहाय्याने उत्तर प्रदेश पोलीस फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसअपवर नजर ठेवणार आहे. मेरठमध्ये यासाठी पहिली सोशल मीडिया सेल बनवण्यात आले आहे. या लॅबच्या साहाय्याने सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment