
बेंगळुरू – इन्फोसिसने एका निवेदनात कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) एम.डी.रंगनाथ यांनी आपल्या कार्यकारी पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली आहे.
इन्फोसिसच्या सीएफओ रंगनाथ यांनी राजीनामा दिला
जारी केलेल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे, की संचालक मंडळाने रंगनाथ यांनी दिलेला सीएफओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी पदाचा राजीनामा स्वीकारला असून १६ नोव्हेंबरपर्यंत या पदावरच ते असतील. मंडळ पुढील सीएफओची नियुक्ती कंपनी लवकरच करेल.
