तिच्या पावलांची छायाचित्रे पाहून चक्रावले नेटकरी !

feet
चीनमधील तैवान येथील एका विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारी एक महिला, विद्यापीठाच्या वेबसाईटवर तिने लिहिलेल्या तिच्या ब्लॉगमध्ये प्रसिद्ध केलेल्या अनेक छायाचित्रांच्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मिडीयावर या महिलेचा ब्लॉग पाहण्यासाठी आणि तिने पोस्ट केलेली छायाचित्रे पाहण्यासाठी लोक अतिशय उतावीळ असतात. ही महिला आपल्या ब्लॉगवर अशी कोणती छायाचित्रे प्रसिद्ध करते, की लोक इतक्या उत्कंठेने तिच्या ब्लॉगची वाट पाहत असतात? तर ही महिला तिच्या ब्लॉगवर तिच्या पावलांची छायाचित्रे प्रसिद्ध करीत आहे.
feet1
या महिलेने प्रसिद्ध केलेली तिच्या पावलांची छायाचित्रे पाहताच आपल्या लक्षात येईल की तिची पावले सर्वसाधारण महिलांच्या पावलांसारखी नाहीत. तैवानच्या एका विद्यापीठामध्ये विद्यार्थिनी असलेल्या या महिलेने आपल्या हातांची आणि पावलांची छायाचित्रे विद्यापीठाच्या साईटवर आपल्या ब्लॉगद्वारे प्रसिद्ध केली आहेत. या महिलेच्या पावलाच्या बोटांची लांबी सर्वसाधारण महिलांच्या पायांच्या बोटांच्या लांबी पेक्षा कितीतरी अधिक असून, या महिलेच्या हाताच्या आणि पायांच्या बोटांची लांबी जवळजवळ एकसारखीच असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या महिलेच्या उजव्या पायाची बोटे डाव्या पायाच्या बोटांपेक्षा अधिक लांब असल्याचे म्हटले जाते.
feet2
अगदी लहानपणापासून आपण फ्लिपफ्लॉप घातल्यानंतर लोकांचे लक्ष आपल्या पावलांकडे आवर्जून जात असल्याचे ही महिला आपल्या ब्लॉगमध्ये म्हणते. अनकेदा लोक या महिलेला ‘ तू परग्रहावरून तर आली नाहीस ना?’ किंवा ‘तु एखाद्या जनावराचे मानवी रूप तर नाहीस ना?’ असे प्रश्न विचारून भंडावून सोडत असत. अश्या या महिलेच्या बाबतीत अधिक जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये कुतूहलाची भावना आहे. पण लोक काहीही म्हणाले तरी तिची पावले तिच्या सौंदर्याचे प्रतीक असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.

Leave a Comment