१६ वर्षीय विद्यार्थ्याने हॅक केला अॅपलचा सर्व्हर

apple
नवी दिल्ली – सर्वाधिक सुरक्षित असे तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅपलचे सर्व्हर मानले जाते. पण एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने चक्क अॅपलचे सर्व्हर हॅक केले आहे. अॅपलच्या ग्राहकांकडून त्याने ९० जीबी डाटाची चोरी केली आहे. अॅपलचा सर्व्हर हॅक करण्यात मोठमोठे आणि प्रसिध्द हॅकर्स अपयशी ठरले असताना, त्याने केलेला पराक्रम अचंबित करणारा आहे.

अॅपलचा सर्व्हर ऑस्ट्रेलियातील एका १६ वर्षाच्या मुलाने हॅक केला. त्याने आपली ओळख लपविण्यासाठी वीपीएनचा वापर केला. पण त्याच्या लॅपटॉपच्या सिरीयल नंबरवरून त्याची ओळख पटली आहे. अॅपलचे दोन लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह आणि मोबाईल त्याच्याकडून जप्त केले आहे. अल्पवयीन असल्यामुळे त्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही.

सर्व्हरमधून डेटा चोरल्यानंतर विद्यार्थ्याने फाईलला हॅक हॅक हॅक नावाने सर्व्हरवर एक फोल्डर तयार केले. डेटा पुन्हा रिस्टोर पण केला. हॅक केल्यानंतर काही कीज पण तयार केले आणि युजर्सचा लॉगीन आणि पासवर्डपण बघितले. परंतु, त्याने डेटा कशाप्रकारे चोरी केला आहे, हे अजून समजले नाही. सर्व्हर हॅक केल्यानंतर विद्यार्थ्याने त्याचे स्क्रीनशॉट काढून मित्रांबरोबर व्हॉट्सअॅपवरपण टाकले. पण पोलिसांनी सॉफ्टवेअर शोधून काढले आहे की त्याने कशाप्रकारे सर्व्हर हॅक केले आहे.

मुलाच्या वकीलाने याबाबत सांगितले, की तो अॅपलचा खुप मोठा फॅन आहे आणि कंपनीबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. पण या घटनेला अॅपल पुढे आणत नाही आणि याबाबत काही खुलासाही केला नाही. परंतु कोर्टाने मुलाला दोषी ठरवले असून, अजून शिक्षा सुनावली नाही.

Leave a Comment