निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने हजयात्रेमध्ये फडकावला तिरंगा

hajj
सध्या पवित्र मक्का येथे हजयात्रा सुरू असून भारताचा स्वातंत्र्यदिन या हज यात्रेदरम्यान आला होता. सोलापूर येथील एका निवृत्त पोलिस आधिकाऱ्याने याचे औचित्य साधत देशभक्ती दाखवत हज यात्रेमध्ये तिरंगा फडकावला आहे. सध्या या दांपत्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हज यात्रेमध्ये स्वातंत्र्य दिनी तिंरगा फडकवत महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोहम्मद पठाण आणि त्यांच्या पत्नीने लाखो भाविकांचे लक्ष वेधले.

सध्या हजारो भारतीय मुस्लीम भाविक सुरू असलेल्या हज यात्रेसाठी तीर्थक्षेत्र मक्का येथे गेले आहेत. मोहम्मद पठाण हज यात्रेदरम्यान भारतीय स्वातंत्र्य वर्धापनदिनाचे औचित्य साधून यांनी तिरंगा फडकावला. हज यात्रेमध्ये भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिन मोहम्मद पठाण यांनी साजरा केला. लाखो भाविकांच्या गर्दीत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोहम्मद पठाण यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन काबाला प्रदक्षिणा घातली. त्यांनी यावेळी उपस्थीत असलेल्या सर्वच भाविकांचे लक्ष वेधले आणि भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त केला. मोहम्मद पठाण आणि त्यांच्या पत्नीवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाची थाप टाकली जात आहे.

Leave a Comment