२७ ऑगस्टपासून गुगलच्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध होणार ‘किंभो अॅप’

kimbho
पुनरागमनासाठी योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि समूहाचं ‘किंभो अॅप’ सज्ज झाले असून आहे. नव्या फिचर्ससह हे अॅप २७ ऑगस्टपासून गुगलच्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध होईल, अशी माहिती पतंजलिचे सह-संस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटरद्वारे दिली.


ट्विटर अकाउंटवरुन पतंजलिचे प्रवक्ता एस.के. तिजारावाला यांनीही किंभोबाबत माहिती दिली आणि अॅपच्या लॉन्चिंग कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील असे सांगितले आहे. हे अॅप सर्वप्रथम मे महिन्यामध्ये लॉन्च करण्यात आले होते. पण लॉन्च झाल्याच्या एका दिवसानंतरच किंभो अॅप वादात सापडले. अॅपमध्ये अनेक अडचणींचा सामना युजर्सना करावा लागत होता, तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनाने यामध्ये काही उपाययोजना समोर नसल्याचेही समोर आले होते. हे अॅप त्यानंतर प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले होते.

Leave a Comment