आजपासून शाओमी एमआय ए२ चा भारतातील पहिला सेल

xaiomi
आज देशात पहिल्यांदाच शाओमी एमआय ए२ या स्मार्टफोनची विक्री सुरू होत असून दुपारी १२ वाजल्यापासून हा स्मार्टफोन अमेझॉन आणि mi.com वरुन खरेदी करता येईल. कंपनीने एमआय ए२आणि एमआय ए२Lite हे दोन स्मार्टफोन गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या आपल्या ग्रँड इव्हेंटमध्ये सादर केले होते. मागच्या काही दिवसांपासून या दोन्ही फोनबाबत बरीच चर्चा होती. आजपासून अखेर एमआय ए२ची विक्री सुरू होत आहे.

२० आणि १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे या फोनच्या मागच्या बाजूला आहेत. तर पुढील बाजूसही २० मेगापिक्सल कॅमेरा सेल्फीप्रेमींसाठी आहे. ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय या फोनमध्ये ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज असलेले व्हेरिअंटही असेल असे सांगण्यात येत आहे, पण या व्हेरिअंटची किंमत किती असणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. रिलायन्स जिओ हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना ४.५ टीबी अतिरिक्त डेटा देणार आहे. तसेच या फोनवर २२०० रुपयांच्या इन्स्टंट कॅशबॅकची ऑफरही देण्यात आली आहे.

Leave a Comment