खराब नेटवर्कमध्येही चालणार ‘ट्विटर लाइट’

twitter
भारतीय युजर्ससाठी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफार्म ट्विटरने ‘ट्विटर लाइट’ हे अॅप लॉन्च केले असून कंपनीने हे अॅप भारतासह २१ अन्य देशांमध्ये सादर केले आहे. या अॅपद्वारे इंटरनेटचा स्पीड कमी असतानाही ट्विटरचा सुलभपणे वापर करता येणार आहे.

लाइट अॅप सादर करणार असल्याची घोषणा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने केली होती. केवळ अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सध्या हे अॅप सुरु करण्यात आले आहे. भारतातील इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे अनेक युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो यासाठीच ट्विटर लाइट हे अॅप लॉन्च करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. केवळ ३ एमबीच्या या अॅपमुळे डेटा आणि स्पेस दोन्हींची बचत होणार आहे. कंपनीने या अॅपची निर्मिती २जी आणि ३जी नेटवर्क लक्षात घेऊन केली आहे. ‘डेटा सेव्हर मोड’चा पर्यायही यामध्ये देण्यात आला असून युजरला याद्वारे कोणते फोटो किंवा व्हिडीओ हवे आहेत तेवढेच ओपन होतील आणि अन्य फोटो किंवा व्हिडीओ ‘ब्लर’ होतील.

Leave a Comment