कर्नाटकातील या गावात ज्योतिषी आहे चक्क गाढव

donkey
कलबुर्गी – कर्नाटकतील कलबुर्गी या गावातील एक भविष्य सांगणारे गाढव सध्या चर्चेत आले असून त्या गाढवाचे नाव पन्नालाल असे आहे. हे गाढव सांगते. कोणता मुलगा इंजिनियर, डॉक्टर, वकिल होईल तसेच कोणता मुलगा अभ्यासात हुशार आहे, कोण आपल्या आई – वडिलांची सेवा करेन, कोण कंजुष किंवा दिलदार आहे यासंबंधी गाढव सांगत असल्याची माहिती मालक खलिल यांनी दिली.

२० रुपयाचे तिकिट या गाढवाचा शो पाहण्यासाठी आकारले जाते. शो ज्यावेळी चालू होतो त्यावेळी सर्वजण सर्कल करून उभे राहतात आणि मध्यभागी गाढव व त्याचा मालक खलील अहमद खान हे असतात. या गाढवाला खलील हा आसपासच्या परिसरात होणाऱ्या यात्रेमध्ये घेऊन जातो. हे त्याठिकाणी त्याचा शो सादर करतात. आपल्याकडे मुर्ख म्हणजे गाढवाची ओळख आहे. पण हे भविष्य सांगणारे गाढव सध्या कर्नाटकात चांगलेच चर्चेत आले आहे. गाढवाचा मालक खलील याने या संदर्भात सांगितले की, वर्षानुवर्षे मी हा शो करत असून लोकांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment