ओप्पोच्या या फोनमध्ये २५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

oppo
मुंबई :चीनी मोबाइल उत्पादक कंपनी ओप्पो एफ ९ प्रो हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत २१ ऑगस्ट रोजी लॉन्च करणार असून नुकतीच याची प्रीबुकींग सुरु करण्यात आली आहे. लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फोटो लिक झाले असून याबाबत या कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नुकताच सॅमसंगने गॅलेक्सी नोट ९ हा आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणल्यानंतर ओप्पोने २५ मेगापिक्सल सेल्फीचा फोन बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. २१ ऑगस्टला तो लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन पहिल्यांदा १५ ऑगस्ट रोजी व्हिएतनाम येथील बाजारात आणला जाईल. ओप्पो एफ-९ प्रो हा ६.३ इंच संपूर्ण एचडी असून यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे अंतर्गत स्टोरेज आहे.

सनराइज रेड, ट्विलाइट ब्लू आणि स्टॅरी पर्पल कलर व्हेरियंटमध्ये हा फोन लॉन्च केला जाणार असून यात VOOC फास्ट चार्जिंगचा पर्याय देण्यात आला आहे. पी ६० प्रोसेसर या फोनमध्ये असून ३५०० एमएएचची मजबूत फोनमध्ये बॅटरी आहे, जी जलद चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनमध्ये सेल्फीसाठी २५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ड्युअल कॅमेरा सेटअपमधील प्रायमरी कॅमेरा १६ एमपी आहे आणि दुय्यम कॅमेरा २ एमपी आहे.

अद्याप भारतीय बाजारपेठेतील या फोनच्या किंमतीची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, व्हिएतनाममध्ये एफ ९ ची सुमारे २३,५०० भारतीय रुपये आहे. १५ ऑगस्टपासून व्हिएतनाममधील फोनसाठी, पूर्व-बुकिंग सुरू होईल. प्री-बुकिंग करणाऱ्यांना १० हजार एमएएच पॉवरबँक मोफत देण्यात येणार आहेत.

Leave a Comment