पोर्न इंडस्ट्रसाठी तिने देश आणि धर्म त्यागला

yasmeena-ali
अफगाणिस्तानी मूळ असलेली प्रसिद्ध पोर्नस्टार यास्मीना अली सध्या नेहमीच चर्चेत असते. ९ वर्षांची असतानाच यास्मिनाने देश सोडला होता. तसेच पोर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तिने इस्लाम धर्माचाही त्याग केला. एका मुलाखती दरम्यान यास्मिना म्हणाली, आपण करत असलेल्या कामावर आनंदी असून आपल्याला या कामासाठी देश आणि धर्म याचा त्याग करावा लागला याबद्दल काहीही वाईट वाटत नसल्याचेही स्पष्ट केले.

यास्मिना म्हणाली मला इस्लाम धर्मात राहून आवडीचे काम निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले नसते. त्यामुळे मी या धर्माचा त्याग केला. त्यानंतर मला माझ्या आवडीचे काम करण्याची संधी मिळाली. आज पोर्न वर्ल्डमधील यास्मिना हे प्रसिद्ध नाव आहे. ती म्हणते काही लोकांना माझा मार्ग आवडणार नाही, पण मी कामावर आनंदी आहे. महिलांवर अनेक अन्याय होताना धर्म मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करतो असे ती म्हणाली.

यास्मिना म्हणाली, माझ्या वडिलांनी सर्वात आधी इस्लाम धर्म माझ्यावर थोपवला. आधी मी अफगाणिस्तानात असताना जेव्हा लहान होते तेव्हा आणि नंतर ब्रिटनमध्ये जेव्हा मी तरुण होत होते तेव्हा माझे आई वडिल मला म्हणाले की, धर्म सर्वात महत्त्वाचा आहे. अगदी मुले आणि आई वडिलांमधील प्रेमा पेक्षाही इस्लाम अधिक महत्त्वाचा आहे. मी काय कपडे परिधान करावे, काय विचार करावा, काय व्हावे हे सर्वदेखिल मला आई वडील सांगत होते.