ऑडीची ही सुपरकार अधिकृतरित्या भारतात लॉन्च

audi2
नवी दिल्ली : आलिशान कार उत्पादक कंपनी ऑडीने अधिकृतरित्या भारतात आरएस ६ अवंत परफॉर्मन्स ही सुपरकार लॉन्च केली असून या कारची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.
audi1
४.० लिटर, वी८ इंजिन आरएस ६ अवंत परफॉर्मन्स मध्ये देण्यात आले असून या कारचे आऊटपूट नॉर्मल मॉडेलच्या तुलनेल वाढवून ६०५ हॉर्स पॉवर आणि टॉर्क ७५० न्यूटन मीटर करण्यात आले आहे. हे स्टॅंडर्ड मॉडेलच्या तुलनेत ४५ एचपी आणि ५० एनएम अधिक आहे. ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स या कारच्या इंजिनाला देण्यात आला आहे.
audi
० ते १०० किमीचा स्पीड ऑडी आरएस ६ अवंत परफॉर्मन्स ही कार ३.७ सेकंदात पकडते. या कारची टॉप स्पीड २५० किमी प्रति तास आहे. ऑडी आरएस ६ अवंत परफॉर्मन्समध्ये नवीन फ्रंट ग्रील, अपडेटेड बंपर, २१ इंच अलॉय व्हिल्स आणि मागे नवीन डिफ्यूजर देण्यात आले आहेत. नवी दिल्लीच्या एक्स-शोरुममध्ये या कारची किंमत १.६५ कोटी रुपये एवढी आहे.

Leave a Comment