‘नासा’ची आता ‘सूर्य’मोहीम !

NASA
मुंबई : आता थेट सूर्यावरच जाण्याची मोहीम प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने आखली असून सूर्याच्या दिशेने नासाचे यान प्रस्थान करणार आहे. मानवी इतिहासातील ही पहिलीच मोहीम असणार आहे. कोणतेही मानवनिर्मित यान याआधी सूर्याच्या जेवढ्या जवळ गेले नव्हते तेवढ्या जवळ जाऊन या यानातून सूर्याच्या पार्श्‍वभूमीचा अभ्यास केला जाणार आहे.

हे यान सूर्याचा करोना हा त्याच्या पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का, यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार असून सौर वादळाची उत्पत्ती सूर्याच्या करोनामधून होते. त्यामुळे या मिशनला अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मिशन मानले जात आहे. हे यान दुसऱ्या यानांच्या तुलनेत सूर्याच्या सातपट अधिक जवळ जाणार आहे. सौर वादळांसंदर्भात सर्वप्रथम अंदाज ‘इजीन पार्कर’ या ९० वर्षीय खगोलशास्त्रज्ञाने वर्तवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या यानाला ‘पार्कर सोलर प्रोब’ असे नाव देण्यात आले आहे. नासा आणि जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था यांनी संयुक्तरित्या १९७६ साली हेलिअस-२ नावाचे यान पाठवले होते.

Leave a Comment