पावसाळ्यामध्ये अवश्य सेवन करावा पुदिन्याचा चहा

tea
पुदिना हा पचनतंत्र सुरळीत ठेवण्यास अतिशय उपयुक्त आहे, हे आपण जाणतोच. पण त्याचबरोबर अनेक औषधी तत्वांनीयुक्त असलेल्या या पुदिन्याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकते. पुदिन्याचा वापर आपण चटणी बनविण्यासाठी किंवा पेयांमध्ये करतोच, तसेच अनेक खाद्यपदार्थांमध्येही पुदिन्याची पाने वापरली जातात. पण त्याचबरोबर पुदिन्याची पाने घालून बनविलेला चहा देखील आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा चहा खास लाभकारी आहे.
tea1
या चहाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. असेच याच्या सेवनाने पचनतंत्र सुरळीत राहून लघवी संबंधी समस्या कमी होण्यास मदत होते. श्वसनाच्या विकाराचा त्रास असणाऱ्यांच्या करिताही या चहाचे सेवन उपयोगी आहे. फंगल इन्फेक्शन दूर करण्यास हा चहा उपयुक्त असून, शारीरिक तणाव दूर करण्यासही हा चहा उपयुक्त आहे. ज्या महिलांच्या ओव्हरीजमध्ये सिस्ट आहेत, त्यांच्यासाठी देखील या चहाचे सेवन हितकारी आहे. तसेच ऑस्टीयोआर्थ्रायटीस असणाऱ्यांच्या करिताही हा चहा उपयोगी आहे.
tea2
हा चहा बनविण्यासाठी दोन कप पाणी, दहा ते पंधरा पुदिन्याची पाने, अर्धा लहान चमचा काळी मिरी, अर्धा लहान चमचा काळे मीठ या सामग्रीची आवश्यकता आहे. हे सर्व साहित्य एकत्र करून पाच मिनिटे मध्यम आचेवर उकळावे. त्यानंतर हा चहा किंवा काढा गाळून घेऊन याचे सेवन करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment