गुगलच्या ‘गलती से मिस्टेक’मुळे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला UIDAI नंबर


नवी दिल्ली – शुक्रवारी दुपारपासून देशभरातल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये UIDAI या नावे १८००३००१९४७ हा क्रमांक ऑटो सेव्ह झाला होता. आपल्या मोबाईलमध्ये हा नंबर कसा आला? हाच प्रश्न अनेकांना पडला होता. पण हे सर्व काही गुगलच्या गलती से मिस्टेकमुळे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. UIDAI या नावे 18003001947 हा क्रमांक शुक्रवारी दुपारी अनेक मोबाईल्समध्ये ऑटो सेव्ह झाल्याने हा ब्रीच ऑफ प्रायव्हसीचा प्रकार आहे की सायबर हल्ला याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. पण आता गुगलच या सगळ्या मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपल्याकडून झालेल्या या चुकीबाबत गुगलने दिलगिरी व्यक्त केली असून जेव्हा हा UIDAI या नावे १८००३००१९४७ हा क्रमांक अँड्रॉईड मोबाईल्समध्ये सेव्ह झाला तेव्हा या क्रमांकाशी आपला काहीही संबंध नसल्याचे UIDAI ने ट्विट करत स्पष्ट केले होते. तसेच यासंदर्भात मोबाईल सर्व्हिस प्रोव्हाईड करण्याऱ्या कंपन्यांनीही हात वर केले होते. मग मोबाईलमध्ये हा क्रमांक ऑटोसेव्ह कसा झाला असा प्रश्न सगळ्यांना पडला होता ज्याचे उत्तर गुगलची चूक असल्याचे आता समोर आले आहे. गुगलने याप्रकरणी आमच्याकडून जी चूक झाली त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आमच्यामुळे मोबाईल धारकांना मनस्ताप सहन करावा लागला याचा आम्हाला खेद असल्याचेही म्हटले आहे.

Leave a Comment