पुन्हा एकदा अंतराळात झेपावणार सुनिता विल्यम


वॉशिंग्टन – आपल्या पहिल्या मानव अवकाश उड्डान कार्यक्रमासाठी जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे नासाने नुकतीच जाहीर केली असून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम हिच्या नावाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. विल्यम यांच्यासह ९ अंतराळवीरांचा या मोहिमेमध्ये सहभाग राहणार आहे.

अमेरिकीच्या एका खासगी अवकाश यानाच्या माध्यमातून या अंतराळवीरांना नासा या मोहिमेसाठी अवकाशात पाठवणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्थेच्या स्पेस एक्स आणि ग्लोवल एव्हिएशन बोइंग या संस्थेने विकसित केलेल्या अवकाशयानातून हे सर्व अंतराळवीर अंतराळात झेपावणार आहेत.

२०१९ च्या मध्यावधीत ही अंतराळ मोहीम होणार असून ९ अमेरिकन अंतराळवीरांना २०११ नंतर पहिल्यांदाच अमेरिकेन बनावटीच्या अवकाश यानातून ते ही अमेरिकेच्या मातीतून अवकाशात पाठवत असल्याची माहिती नासाचे प्रबंधक जिम ब्रिडेनस्टिने यांनी दिली.