व्हॉटस्अॅपवरील एक गेम लोकांमध्ये निर्माण करत आहे दहशत


एखादी गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंड झाली तर याची क्रेझ सेलिब्रिटीसह जगात निर्माण होते. सध्या तर कीकी चॅलेंजने लोकांना अक्षरशः वेड लावले आहे. चालत्या कारमधून उतरुन नाचण्याचे आव्हान स्विकारायचे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायचे. आता तर एक नवीन गेम फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर आला आहे. लोकांमध्ये हा नवीन खेळ भय निर्माण करत आहे.

सोशल मीडियावर तुम्ही जास्त वेळ घालवत असाल तर सावधानता बाळगा. ब्लू व्हेल चॅलेंजप्रमाणे व्हॉटस्अॅपवर मोमो गेम लोकांच्या जीवाशी खेळत आहे. लोकांच्या जीवनास मोमो व्हॉटस्अॅप गेममुळे धोका निर्माण होत आहे. ब्लू व्हेल चॅलेंजच्या ओळीत बनलेल्या या आव्हानामुळे लॅटिन अमेरिकन देशांतील लोकांची झोप उडाली आहे.

मोमो व्हॉटस्अॅप एक क्रमांक आहे. जो व्हॉटस्अॅपवर शेअर केला जात आहे. हा नंबर जोडल्यानंतर चित्रातील चेहरा धडकी भरवणारा दिसतो. हा नंबर जोडल्यानंतर, अशी अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांवर आत्महत्या करण्यासाठी हळूहळू उत्तेजित करतात. मोमो गेमचा क्रमांक हा जपान एरिया कोडबद्दल सांगण्यात येत आहे. सर्वप्रथम फेसबुकवर पाहिले गेले, त्यानंतर अनेक लोकांनी दिलेल्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. बातम्यांनुसार, मोमो वॉटसॅपवर दिसणारी भितीदायक चेहरा एका जपानी संग्रहालयात ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे आहे.

तसचे, अनेक लोक असेही म्हणतात की, मोमो हे एक कट रचण्याचा प्रकार आहे. या मुख्य हेतू हा लोकांना घाबरवण्याच्या उद्देशाने व्हायरल केला आहे. दरम्यान, या नंबरचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, हा नंबर पाठवलाय, याचा शोध लागू शकलेला नाही. सोशल मीडिया साइटवर संपर्क क्रमांक व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी समान प्रोफाइल बनविले आहे. लॅब एक्सपर्ट तज्ज्ञांनी मोमो नंबर वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. ही संकल्पना कोणी आणि कुठे पसरली जात आहे, हे अद्याप ठरविण्यात आले नाही.

Leave a Comment