जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे एकट्या अॅपल कंपनीचे उत्पन्न


१ ट्रिलिअन डॉलर किंवा एक लाख कोटी रुपयांचे भांडवली बाजारात मूल्य असणारी प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी अॅपल कंपनी ही पहिली अमेरिकन कंपनी बनली आहे. जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त या एकट्या कंपनीचे भांडवली मूल्य आहे. कंपनीची भांडवली बाजारातील भारतीय रुपयांमध्ये मूल्य सुमारे ६८,६२० अब्ज रुपये एवढी आहे. यावरुन हे स्पष्ट हेते की, शेअर बाजारातील अॅपल कंपनीची पत भारतीय अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के हिश्याऐवढी आहे.

सध्या अॅपल कंपनी एवढी ताकदवान बनली आहे की, ३ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानसारख्या देशापेक्षाही जास्त किंमत तिच्या एकत्रित शेअर्सच्या मूल्याची आहे. त्याचबरोबर अॅपल ही भारतातील दोन सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि टीसीएस या कंपन्यांपेक्षाही १० पट मोठी कंपनी ठरली आहे. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, अॅपलच्या बाजारमूल्यापेक्षा जास्त जगातील १९३ देशांपैकी केवळ १६ देशच असे आहेत ज्यांचा जीडीपी आहे. म्हणजेच अॅपल कंपनी १७७ देशांपेक्षा श्रीमंत आहे. सध्या अॅपलचे बाजार मूल्य हे इंडोनेशियाच्या जीडीपीएवढे आहे.

Leave a Comment