व्हिएतनाम मधील सोनेरी पुलाला देवाच्या हातांचा आधार


व्हिएतनाम येथील एका पुलाला चक्क ईश्वराच्या हातांचा आधार लाभला आहे यामुळे हे हात पाहण्यासाठी देशवासीय तसेच परदेशी पर्यटक प्रचंड गर्दी करत आहेत. उंचावरून खालच्या दऱ्या, निसर्गदृश्ये पहावीत असे प्रत्येकाला वाटते. त्याच हेतूने हा पूल व्हिएतनामच्या दा नांग मध्ये उभारला गेला आहे. या पुलाचे नाव आहे काऊ वांग म्हणजे सोनेरी पूल किंवा गोल्डन ब्रिज. १५० मीटर लांबीचा हा पूल समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर आहे. या पुलाला प्रचंड मोठ्या आकाराच्या दोन हातानी आधार दिला गेला आहे.


हे हात दगडाच्या रंगातले असून त्यांना देवाचे हात असे म्हटले जात आहे. या पुलावरून खालचे सौदर्य आणि हिरवेगार डोंगर न्याहाळणे म्हणजे डोळ्यांना मेजवानीच. बाना हिल्स या नावाचा हा भाग २० व्या शतकाच्या सुरवातीला फ्रांसच्या ताब्यात होता मात्र १९४५ च्या क्रांतीमध्ये हा सारा भाग उध्वस्त झाला होता. हा भाग नव्याने वसविला गेला असून हा अनोखा पूल येथे बांधला गेला आहे आणि अनेक सुंदर रिसोर्टहि बांधली गेली आहेत. या सुंदर पुलाचे इतके फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत कि हा पूल उभारणाऱ्या वास्तू विशारदांना आनंदाचा धक्का बसला आहे.

वू वेत अँड लँडस्केप या फर्मचे संस्थापक म्हणले आमचे हे डिझाईन इतके लोकांना आवडेल याची कल्पना नव्हती पण लोकांना ते फारच आवडले याचा आनंद वाटतो.

Leave a Comment