अमेझोन ठरली जॅकी आणि माईक बेजोस यांची सर्वोत्तम गुंतवणूक


अमेझोनचा मालक जेफ बेजोस याची आई जॅकी आणि सावत्र वडील माईक बेजोस यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या गुंतवणुकीतील सर्वोत्तम गुंतवणूक कुठली हे आता उघड झाले आहे. १९९५ च्या सुरवातीला त्यांनी बेजोस च्या अमेझोन मध्ये केलेली गुंतवणूक त्याच्यासाठी सर्वाधिक फायद्याची ठरली असून त्याकाळी केलेल्या २ लाख ४५ हजार ५७३ डॉलर्स गुंतवणुकीचे आता तब्बल ३० अब्ज डॉलर्स( २ लाख कोटी) झाले आहेत. मणजे त्यांची गुंतवणूकीतून त्यांना १ कोटी २० लाख पट परतावा मिळाला आहे.

ब्लूमबर्ग कडून हि माहिती दिली गेली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातली आठवण जेफच्या वडिलांनी सांगितली आहे. ते म्हणतात १९९५ मध्ये जेफ थँक्स गिव्हिंगसाठी घरी आला होता आणि तेव्हा त्याने अमेझोन मध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात बोलणे केले. हि गुंतवणूक जोखीमीची असल्याचे त्याने सांगितले होते तरी आम्ही त्याच्या कंपनीत पैसे गुंतविण्याचा निर्णय घेतला.

जेफच्या आईवडिलांचा अमेझोन मधील हिस्सा १९९९ नंतर घोषित केलाच गेला नव्हता. २००१ ते २०१६ या दरम्यान या जोडप्याने ५ लाख ९५ हजार २७ शेअर्स दान म्हणून बेजोस फॅमिली फौंडेशनला दिले आहेत.२०१६ मध्ये त्यांनी २५ हजार शेअर दान दिले त्यावेळी त्याची किंमत १.३६ लाख कोटी होती. आजमितीला या जोडप्याकडे १ कोटी ६६ लाख शेअर्स असून त्यांची कंपनीतील भागी ३.४ टक्के आहे. जेफ नंतर सर्वाधिक शेअर्स त्यांच्याकडे आहेत.