पांडवानी स्थापलेले लोधेश्वर महादेव मंदिर


उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्यातील रामनगर येथे एक अति प्राचीन शिवालय असून येथे शिवलिंगाची स्थापना पांडवानी केली असा समज आहे. त्याकाळी येथे दाट अरण्य होते आणि पांडव अज्ञातवासात होते तेव्हा येथे लपून दिवस काढत होते. त्यावेळी त्यांनी रुद्र महायज्ञ केला होता. हा भाग त्याकाळी बारा वन नावाने ओळखला जात असे. या जागी आजही पांडव वास्तव्याच्या अनेक खुणा सापडतात तसेच यज्ञकुंडही पाह्यला मिळते. महाभारतात या जागेचे अनेक उल्लेख आहेत.


येथून जवळच असलेल्या किंतूर येथे देशातील एकमेव विशेष पारिजात वृक्ष आहे. असे मानतात कि अमृतमंथनातून निघालेला पारिजात कृष्णाने स्वर्गात आणून पृथ्वीवर लावला तो हाच आहे. स्वर्गातून आणल्यानंतर अर्जुनाने पाताळात बाणाने छेद केला त्यात हा पारिजात लावला गेला. या झाडाची फुले पिंडीवर वाहून कुंती शिवाची पूजा करत असे. या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. याचा एकंदर घेर आणि उंची देशातील कुठल्याची पारिजात झाडापेक्षा खूपच अधिक आहे.

लोधेश्वर मंदिरात एक जलकुंड आहे. त्याला पांडव कूप असे नाव आहे. या कुंडातील जल प्राशन केल्यास सर्व व्याधी दूर होतात असा विश्वास आहे. कावडी वाहून नेणारे कावडिये या ठिकाणी कावड वाहायला आवर्जून येतात. श्रावणात येथे मोठी जत्रा भरते.

Leave a Comment