
नवी दिल्ली – ट्विटर आणि फेसबुकनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूट्यूबवरही स्टार झाले असून त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील फॉलोअर्सच्या संख्येने तब्बल १ मिलियनचा टप्पा पार केला आहे.
फेसबुक, ट्विटरमागोमाग आता यूट्यूबवर देखील मोदींचे साम्राज्य
यासंदर्भात ट्विट करत केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असलेले जनतेचे प्रेम आणि स्नेहाचा आणखी एक पुरावा, त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील फॉलोअर्सच्या संख्येने १ मिलियनचा टप्पा पूर्ण केला आहे. यूट्यूबवरही पंतप्रधान मोदी जबरदस्त सक्रिय असून सार्वजनिक सभांतील आपली भाषणे आणि रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे व्हिडिओदेखील ते यूट्यूबवर शेअर करत असतात.
ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे भारतीय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओळखले जातात. ट्विटरवर त्यांना तब्बल ४३ मिलियनहूनही अधिक लोक फॉलो करतात. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी फेसबुकवरही सक्रिय आहेत. येथे त्यांना तब्बल ४३ मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.
