गाढवांना पर्यटकांचे जड झाले ओझे


ग्रीस येथील सांतोरिनी बेट पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणातील एक आहे आणि दरवषी येथे हजारो पर्यटक हजेरी लावतात. क्रुझमधून दररोज किमान १२०० पर्यटक या बेटावर उतरत असतात. समुद्राकाठी डोंगरावर असलेले हे सुंदर बेत. येथील घरे, हॉटेल डोंगरात असून तेथे चढून जावे लागते. पर्यटकांना चढण्या उतरण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून येथे गाढवांच्या पाठीवर पर्यटकांना बसविले जाते. आजकाल युरोप, अमेरिका, रशिया येथील अनेक पर्यटक येथे येत आहे मात्र त्यात ओव्हरवेट पर्यटकांची संख्या मोठी असल्याने त्यांना वाहून नेणे गाढवांच्या जीवावर बेतू लागले आहे.

या गोलमटोल पर्यटकांना पाठीवर घेऊन डोंगर चढायचा तर पाठीवरील जीन मुळे गाढवांना जखमा होतात. मालक त्यांना खायला प्यायला पुरेसे देत नाहीत तसेच पर्यटक जास्त असतील तर विश्रांतीहि दिली जात नाही. त्यामुळे येथील प्राणीप्रेमी संस्था तसेच सांतोरिनी डाँकीज चॅरिटी संस्था गाढवांच्या रक्षणासाठी पुढे आल्या आहेत.

या संस्थांनी पर्यटकांना गाढवाच्या पाठीवर बसविताना गाढवाची क्षमता पहावी, ५० किलो पेक्षा अधिक वजनाची माणसे गाढवाच्या पाठीवर बसवू नयेत. चांगली उंची, ताकद आणि कामाची अधिक क्षमता असलेल्या क्रॉस बीड जातीच्या गाढवांचा वापर केला जावा, गाढवांना पुरेशी विश्रांती आणि खाद्य दिले जावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

गर्दी असेल तर या गाढवांना डोंगरावर ४-५ फेऱ्या माराव्या लागतात. या काळात तापमान ३० डिग्री पर्यंत असते त्यामुळे त्याचाही त्रास गाढवांना होतो. रस्ता चांगला नाही. त्यातून हि गाढवे निरुपयोगी ठरली तर मालक त्यांना सोडून देतात किंवा डोंगराच्या कडेवरून खाली थकलून देतात असे या संस्थांचे म्हणणे आहे.

Leave a Comment