ब्लॅकबेरी की २ लाईट स्मार्टफोनचे फोटो लिक


ब्लॅकबेरी लवकरच की २ लाईट हा कीपॅड असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असून त्याचे फोटो सोशल मिडीयावर लिक झाले आहेत. डिलनटेक वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा फोन पुढील महिन्यात आयएफए बर्लिन मध्ये सादर केला जाईल आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये तो ग्राहकांना उपलब्ध होईल असे समजते. रेड, ब्लू आणि कॉपर अश्या रंगात तो मिळण्याची शक्यता आहे.

चीनी कंपनी टीसीएलने या फोनचे डिझाईन केले आहे. ब्लॅकबेरीने की २ हा फोन गेल्या महिन्यात सादर केला आहे त्याचे हे स्वस्त व्हर्जन असेल. कमी बजेट असलेल्या स्मार्टफोन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ब्लॅकबेरी या नव्या फोनचा वापर करत आहे. लिक झालेल्या फोटोनुसार या फोनला ड्युअल रिअर कॅमेरा एलइडी फ्लॅश सह असेल आणि तो अँड्राईड ओरिओ ओएस सह येईल. या फोनची अंदाजे किंमत ४०० डॉलर्स म्हणजे २७६१८ रुपये असेल असे समजते. सुरक्षेच्या दृष्टीने हा फोन उत्तम दर्जाचा आहे असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment