गुगल जगभरात कॉलसेंटर मध्ये व्हर्चुअल एजंट नेमणार


गुगल आर्टीफीशिअल इंटेलीजन्स तंत्रज्ञनाचा वापर करून जगभरातील कॉल सेंटरमध्ये व्हर्चुअल एजंट तैनात करणार आहे. हे एजंट कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्याप्रमाणेच काम करणार असून ग्राहकाकडून विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार आहेत. सिसो, जेन्सीस सारख्या बड्या कंपन्या या कामी गुगलला सहकार्य करत आहेत. त्याच्या मदतीने गुगल यासाठीचा प्रोग्राम तयार करत आहे.

कॉलसेंटर मध्ये हे एजंट येणारे सर्व फोन कॉल्स घेतील. मानवी आवाजात ते बोलतील आणि माणसासारखेच काम करतील. मुख्य शास्त्रज्ञ फेफे ली या संदर्भात म्हणाले जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर हे एजंट देऊ शकत नसतील तर ते कॉल संबंधित माणसाकडे ट्रान्स्फर करतील. कॉल करणाऱ्या ग्राहकाला माणसाशीच बोलायचे असेल तरी हे एजंट कल फॉरवर्ड करतील.

Leave a Comment