विशालकाय वडाचे हे झाड आहे २५० वर्षांचे


गिनीज बुक मध्ये सर्वात मोठे अशी नोंद झालेले कोलकाता येथील जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मधील वडाचा विशालकाय वृक्ष एकदातरी तेथे जाऊन पाहायला हवा असा अद्भुत आहे. १७८७ साली हा वृक्ष येथे लावला गेला तेव्हा तो २० वर्षाचा होता आणि आता त्याने वयाची २५० वर्षे पूर्ण केली आहेत. १३ खास लोकांची टीम या वृक्षाची देखभाल करते. यात वनस्पती तज्ञहि आहेत. या झाडाने जागतिक रेकॉर्ड नोंदविले आहे.

या वृक्षाचा पसारा १४५०० चौरस मीटर परिसरात पसरला आहे. लांबून या झाडाकडे पहिले तर ते जंगल वाटते. वडाच्या पारंब्या पाणी शोधात जमिनीकडे येतात. या पारंब्या म्हणजे झाडाची मुळे असतात त्यामुळे त्या जमिनीत घुसतात आणि वाढत राहतात. या वडाच्या अश्या ३३७२ पारंब्या जमिनीत घुसून त्याचे जंगल बनले आहे. १८८४ ते १९२५ या काळात आलेल्या चक्रीवादळाने या झाडाचे मोठे नुकसान केले तरीही सर्वात विशाल वृक्ष हा त्याचा खिताब कायम आहे.


या झाडावर विविध ८७ प्रकारच्या जातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. पर्यटकांना हा मोठा आनंदाचा ठेवा वाटतो. या झाडाची सर्वात उंच फांदी २४ मीटर आहे. या झाडाच्या सन्मानासाठी १९८७ मध्ये पोस्टाचे तिकीट जारी केले गेले होते. बनायन बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे हा वृक्ष प्रतिक चिन्ह आहे. सध्या या झाडाच्या फांद्या पूर्वेच्या दिशेने अधिक वाढत आहेत असे येथील कर्मचारी सांगतात.

Leave a Comment