
मुंबई : व्होडाफोनने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सर्वात स्वस्त प्लान लॉन्च केला असून त्यामुळे आता पुन्हा एकदा टेरिफ वॉर सुरु होण्याचे संकेत मिळत आहे. ४७ रुपयांचा नवा प्लान व्होडाफोनने आणला आहे. यात मोफत कॉल, डेटा आणि एसएमएस मिळणार आहे. या पॅकची मुदत २८ दिवसांची आहे.
व्होडाफोनने आणला सर्वात स्वस्त प्लान
४७ रुपयांच्या या पॅकमध्ये १२५ मिनिटे मोफत कॉलिंग मिळेल. यात लोकल आणि एसटीडी आणि रोमिंक कॉल करु शकता. त्यासोबत २८ दिवसांसाठी ५०० एमबी २ जी, ३ जी आणि ४ जी डेटा मिळेल. या प्लानमध्ये ५० एसएमएस तुम्ही करु शकता. तुमच्या मोबाईल बॅलन्समधून हा प्लान वापरता येणार आहे. तसेच तो बॅलन्सच्या माध्यमातून अॅक्टीव्ह करता येऊ शकतो.
