अवघ्या तीन महिन्यातच दुसर्‍यांदा विवो व्ही ९ युथ एडिशनच्या मूल्यात कपात


आपल्या व्ही ९ या स्मार्टफोनच्या युथ एडिशनमध्ये पुन्हा एकदा विवो कंपनीने कपात जाहीर केली आहे. स्मार्टफोन कंपन्यांना आपल्या विविध मॉडेल्सच्या मूल्यात स्मार्टफोनच्या वाढत्या स्पर्धेमुळे वारंवार कपात करावी लागत आहे. विवो व्ही ९ युथ एडिशनच्या मूल्यात या अनुषंगाने कपात करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात विवो व्ही ९ युथ एडिशन १८,९९९ रूपयात लाँच करण्यात आले होते. यानंतर याचे मूल्य जून महिन्याच्या अखेरीस एक हजाराने कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा यात हजार रूपयांची कपात करण्यात आल्यामुळे हा स्मार्टफोन आता १६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंच आकारमानाचा डिस्प्ले फुल एचडी प्लस अर्थात २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. आहे. तर यातील बॅटरी ३२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे.

Leave a Comment