हिमालयात अज्ञात ठिकाणी आहे हि अद्भुत नगरी


जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मरणार हे अटळ सत्य आहे. मात्र तरीही अमरत्व प्राप्त व्हावे यासाठी प्राचीन काळापासून विविध प्रकारच्या साधना केल्या जात आहेत. समुद्रमंथनातून अमृत काढण्याचा प्रकार देवांना अमरत्व मिळावे म्हणूनच होता. अमृत प्राशन करणाऱ्याला मृत्यू येत नाही असा समज आहे. हिमालय भारतीय लोकांसाठी साधू संतांची, तपस्वी लोकांची पवित्र भूमी आहे. असे म्हणतात हिमालयात एक अशी जागा आहे जेथे वास्तव करणारे अमर आहेत. म्हणजे त्यांना मृत्यू नाही. केवळ हिंदू नाही तर तिबेटी, बौद्ध धर्म ग्रंथात या जागेचा वेगवेगळ्या नावानी उल्लेख येतो. वेद, पुराणे यातही या जागेचा उल्लेख आणि त्यासंदर्भातल्या अनेक कथा येतात.

असे मानले जाते कि हिमालयात कुठेतरी २४०० किमी लांबीचे हे स्थान आहे. या ठिकाणी राहणारे लोक वेळोवेळी पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीच्या कारभारात योग्य तो बदल घडवितात. विष्णूच्या दशावतारातील दहावा अवतार कल्की याच्या कथेत या शहराचे उल्लेख सापडतात. असे मानले जाते कि कलियुगात अवतार घेणाऱ्या कल्कीचे गुरु या ठिकाणी राहून त्याच्या अवताराची प्रतीक्षा करत आहेत. हि जागा साम्भल, सिद्धाश्रम, शांग्री ला या नावाने ओळखली जाते. युधिष्ठीर त्याच्या जीवनाच्या अंतिम चरणात परिवारासह येथे आला होता असा समज आहे.

आजच्या आधुनिक यंत्रांचा, उपकरणांचा वापर करूनही हि जागा नक्की शोधता आलेली नाही. ती शोधणे अवघड आहे. प्राचीन ग्रंथातील नकाशे पाहूनही या जागेचा शोध लावता आलेला नाही. मात्र तरीही अशी जागा अस्तित्वात आहे यावर लोकांचा विश्वास आहे.

Leave a Comment