
नवी दिल्ली – रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून एकाहून एक भन्नाट ऑफर्स आणल्या जात आहेत. त्यात आता जिओच्या १९८ रुपयांच्या प्लॅनला पर्याय म्हणून बीएसएनएलने १७१ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे.
बीएसएनएलने आणला जिओपेक्षाही स्वस्त प्लॅन
या नव्या प्लॅनमध्ये बीएसएनएल आपल्या युजर्सला एका महिन्यासाठी दरदिवशी २ जीबी ३जी डेटा देणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्सची सुविधा तसेच मोफत एसएमएसही करता येणार आहेत. बीएसएनएलचा हा प्लॅन सध्या केवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येच उपलब्ध करण्यात आला आहे, पण हा प्लॅन लवकरच अन्य ठिकाणीही ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाण्याची शक्यता आहे.
