व्याकरणाच्या चुका सुधारण्यास मदत करणार Google Docs


जाएंट सर्च इंजिन असलेली गुगल कंपनी सध्या आपल्या वर्ड प्रोसेसर अॅप ‘गुगल डॉक्स’मध्ये ‘ग्रामर सजेशंस’ या फिचरची चाचणी घेत असून या फिचरची चाचणी यशस्वी झाल्यानंतर गुगलच्या स्पेल-चेकिंग टूलमध्ये या फिचरचा समावेश केला जाईल. युजरला याद्वारे व्याकरणाच्या चुका सुधारण्यास मदत होईल. चुकीचे शब्द या नव्या फिचरद्वारे निळ्या रंगामध्ये दाखवले जातील. यावर अद्याप चाचणी सुरू असून काही ठराविक युजर्सना थोड्याच दिवसांमध्ये याचा वापर करता येणार आहे. कोणत्या चुका युजर्सकडून होतात हे लक्षात आल्यानंतर या सेवेमध्ये खूप चांगली सुधारणा होईल, कारण युजर्सच्या चुकांद्वारे हे फिचर वेळोवेळी अपडेट केले जाईल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment