सोनी एक्सपिरीया एक्सझेड २ भारतात लाँच


सोनीने त्यांचा एक्सपिरीया एक्सझेड २ स्मार्टफोन भारतात लाँच केला असून त्याची किंमत आहे ७२९९० रुपये. सोनीची निवडक सेन्टर्स आणि निवडक रिटेल स्टोर मधून हा फोन १ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. अॅडव्हांस मोशन आय कॅमेरा टेक्निक, हाय रेझोल्युशन ऑडीओ, फ्रंट फेसिंग स्टीरीओ स्पीकर अशी या फोनची वैशिष्टे आहेत. लिक्विड ब्लॅक कलर कलर मध्ये हा फोन मिळणार आहे.

या फोनला ५.७ इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. ड्युअल सीम, अँड्राईड ओरिओ ८.० ओएस, ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, मायक्रोकार्डच्या सहाय्याने ते ४०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १९ एमपीचा मोशन आय रिअर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रांत कॅमेरा, २३ एमएन वाईड अँगल लेन्स, ऑटो फोकस, स्टेडी शॉट अश्या सोयी दिल्या गेल्या आहेत. वायरलेस चार्जिंग, रिअरला फिंगरप्रिंट सेन्सर, ३१०८ एमएएच ची बॅटरी अशी त्याची अन्य फिचर आहेत.

Leave a Comment