ऑनरचा ‘९ एन’ भारतात लॉन्च; ३१ जुलैपासून विक्री सुरू


मुंबई : भारतात आपला बजेट स्मार्टफोन ‘ऑनर ९ एन’ चीनी स्मार्टफोन निर्माता हुआईचा सब ब्रान्ड ‘ऑनर’ने लॉन्च केला आहे. दोन मेमरी वेरिएन्टमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी वेरिएन्टची किंमत ११,९९९ रुपये तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी वेरिएन्टची किंमत १३,९९९ रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट किंवा कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून हा स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकेल.

३१ जुलैपासून ‘ऑनर ९ एन’ची विक्री सुरू होणार असून रिलायन्स जिओ लॉन्च ऑफरमध्ये २,२०० रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. सोबतच १०० जीबी अॅडिशनल डाटा मिळेल तसेच १,२०० रुपयांचे मिंत्राचे वाउचरदेखील मिळणार आहे. हा स्मार्टफोन लेवेंडर पर्पल, सफायर ब्लू, मिडनाईट ब्लॅक आणि रॉबिन एग ब्लू कलर व्हेरिएन्टसोबत उपलब्ध होणार आहे. पण तूर्तास हा फोन ब्लू आणि ब्लॅक व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे.

५.८४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले या फोनमध्ये देण्यात आला असून हा स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’ असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये हुआईचे Kirin ६५९ प्रोसेसर आणि हायब्रिड सिम स्लॉट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड ८.० ओरिओवर आधारित EMUI वर चालतो. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले असून यात १३ मेगापिक्सलचा एक सेन्सर आहे. तर दुसरा २ मेगापिक्सलचा आहे. तसेच दोन्ही लेसचे अपर्चर f/२.२ आहे. या स्मार्टफोनमध्ये ३०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. परंतु, यात युएसबी टाईप सी देण्यात आलेला नाही.

Leave a Comment