ऑनलाईन सुरु केलेल्या व्यवसायात ४ मित्रांनी केली १ वर्षात २५ कोटीपेक्षा जास्त कमाई


मुंबई : आयफोन १० सारखे हायएंड स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी हायपरएक्सचेंज कंपनी देते. सेकंड हॅण्ड फोन दुरूस्त केल्यानंतर ही कंपनी ते फोन तुम्हाला स्वस्तात विकते. या मोबाईल फोनचा बाजार दरवर्षी ४०० टक्क्यांनी वाढत आहे. ४ मित्रांनी याच संधीचा फायदा घेऊन २०१६ मध्ये या कंपनीची सुरूवात केली. आता २ वर्षात या कंपनीचा व्यवसाय २५ कोटींवर जाऊन पोहचला आहे.

कोलकात्यात हायपर एक्सचेंज एक ओ २ आणि ऑनलाईन-टू-ऑफलाईन मार्केटप्लेस असून तुम्ही येथून रीफर्बिश्ड गॅझेट्स वारंटीसह तसेच इन्शुरन्सने खरेदी करू शकतात. २०१६ मध्ये ही कंपनी सत्निक रॉय, दीपांजन पुरकायस्थ, आशीष चक्रवर्ती आणि द्विजो चटर्जी या ४ मित्रांनी मिळून सुरू केली.
टेलिकॉम सेक्टरमध्ये वाढत्या स्पर्धेमुळे डेटा स्वस्त होत आहे, पण समाजातील प्रत्येक माणसाकडे स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. प्री-ओन्ड फोनची प्रीमियम कॅटेगरीची डील हायपरएक्स्चेंजमध्ये होते. ही गॅझेटस कंपनी फोनने सुरू झालेला हा कारभार हळू हळू टॅब, लॅपटॉप सारख्या वस्तू देखील जोडत आहे.

रिसेल-मार्केटमध्ये या मॉडेलवर केलेले काम करणे एवढे सोप नाही आणि त्यापेक्षाही जास्त मोठे आवाहन आहे ग्राहकांचा विश्वास जिंकणे. एकाकडून खरेदी केलेला फोन दुसऱ्याला विकताना अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. व्हॅल्यू एड करताना सोबत कंपनी प्रॉडक्ट वारंटीवर देखील भर दिला जातो. ईबे आणि अमेझॉनवर देखील ते या फोनची रिटेलिंग करतात.

Leave a Comment