गुजराथचा सुंदर पण झपाटलेला दुमास बीच


सुरत या गुजरातच्या गजबजलेल्या शहरापासून २० किमीवर असलेली दुमास या नितांतसुंदर बीच ची ख्याती देशातील सर्वाधिक झपाटलेला बीच अशी असून या किनाऱ्यावर सायंकाळ नंतर जाण्यास बंदी घातली गेली आहे. वास्तविक दिवसभर हा बीच गजबजलेला असतो आणि विशेषतः प्रेमी युगले येथे मोठ्या संखेने येतात. मात्र दिवसभर मौजमस्ती केली तरी सायंकाळ होऊ लागली कि हा बीच सुना होऊ लागतो.


या बीचवर रात्री भूतांचा धुमाकूळ चालतो असा समज आहे. या बीचवर रात्री अनेकदा हसण्याचे, आरडओरड करण्याचे आवाज येतात. भुतांच्या वास्तव्यामुळे या बीचवरील वाळू सफेत नसून काळी आहे असेही सांगितले जाते. या ठिकाणी फार पूर्वी हिंदू स्मशान होते आणि येथे आजही अतृप्त आत्म्यांचा संचार आहे असा अनेकांना विश्वास आहे.

Leave a Comment