अंबानी कुटुंबाने सुनेला भेट दिली महागडी बेन्टले


देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश याची नियोजित वधु श्लोका मेहता हिला साखरपुड्याचे गिफ्ट म्हणून महागडी बेन्टले बेन्टीगा कार भेट दिली आहे. आकाश अंबानींची हिरव्या रंगाची बेन्टली बेन्टीगा एसयुव्ही मुंबईकरांच्या चांगलीच परिचयाची आहे. दुसऱ्या नव्या बेन्तिगाची नोंदणी गेल्या महिन्यात केली गेली असून या कार देशातील सर्वात महाग कार मध्ये सामील आहेत.

बेन्टलीची नवी एसयुव्ही श्लोका ला साखरपुड्याची भेट म्हणून दिली गेल्याची बातमी मिडीयावर झळकली असून याच गाडीतून श्लोका आणि तिचे कुटुंबीय साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आले होते तसेच त्यानंतरही श्लोकाला हि गाडी वापरताना पहिले गेले आहे. आकाश यांच्या कारला व्ही १२ इंजिन आहे तर नवी गाडी व्ही ८ इंजिन ची असून तिची बेसिक किंमत ३.७८ कोटी आहे. या गाडीच्या एक्सेसरिजही अश्याच महाग आहेत. या गाडीच्या २१ इंची अॅलॉय व्हीलची किंमत १६ लाख रु. आहे असेही समजते.

Leave a Comment