मोबाईलमधून निघणाऱ्या क्ष-किरणांमुळे मुलांच्या स्मरणशक्तीवर होतो परिणाम


लंडन – स्विस रिसर्चस यांच्या अहवालात मोबाईलमधून निघणाऱ्या क्ष-किरणांमुळे लहान मुलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार असे आढळून आले, की किशोरवयीन मुलांच्या स्मरण क्षमतेवर मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडियोफ्रेक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड एक्सपोजरचा परिणाम होतो. मुळतः किशोरवयीन मुलांच्या उजव्या बाजुच्या मेंदूवर रेडियोफ्रेक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या एक्सपोजरचा स्मृतीवर मोबाईल फोनमुळे परिणाम होतो. फोनवर बोलताना हेडफोनस् किंवा मोठ्या आवाजात स्पीकरचा वापर केला, विशेषतः कमी नेटवर्क क्षेत्रात मोबाईल फोनचा वापर केल्यास मेंदूवर संभाव्य जोखीम होण्याची शक्यता असते.

Leave a Comment