१०० च्या नव्या नोटा एटीएम मधून मिळण्यासाठी १०० कोटींचा खर्च


रिझर्व बँकेने भारतीय चलनात नवी १०० रु. ची नोट आणली असली तरी या नोटा एटीएम मधून मिळण्यासाठी सरकारला १०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. नव्या नोटांचा आकार थोडा लहान असल्याने एटीएम रीकॅलीबरेट करावी लागणार आहेत. देशात २.४ लाख एटीएम्स असून ती सर्व या नोटांसाठी सुलभ करायची तर त्याला १०० कोटी रु. खर्च करावे लागणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय चलनात नुकतीच २०० रु. ची नवी नोट आली आहे. त्यासाठी एटीएम कॅलीबरेशन करावे लागले होते. ते काम अजून पूर्ण झालेले नाही तोपर्यंत नवी नोट चलनात आली आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले हे काम पूर्ण होण्यास १ वर्षाचा कालावधी लागेल. नव्या जुन्या नोटा एकाच एटीएम मधून मिळण्याची सुविधा देणे हे आव्हानात्मक काम आहे.

नवी १०० ची नोट पूर्णपणे स्वदेशी आहे. म्हणजे तिचा कागद, छापी, डिझाईन पूर्णपणे स्वदेशी असून डिझाईन मैसूरच्या बीजेबीव्हीएम ने केले आहे. म्हणजे हि नोट पूर्णपणे मेड इन इंडिया आहे.

Leave a Comment