
इंटेक्सने ४९९९ रुपयात ४ हजार एमएएच ची बॅटरी असलेला आणि अनेक आधुनिक फिचर असलेले स्मार्टफोन ईंडी ५ नावाने बाजारात सादर केला आहे. ब्लॅक आणि शँपेन कलरमध्ये तो कंपनीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
इन्टेक्सने आणला दमदार बॅटरीचा ईंडी ५ स्मार्टफोन
या फोनसह स्विफ्ट कि तसेच अमेझोन प्राईम व्हिडीओ, क्यूआर कोड स्कॅनरसह दिला गेला आहे. फोनला ५ इंची फुल एचदि स्क्रीन ड्रॅगन ग्लास प्रोटेक्शन सह दिला गेला असून ग्राफिकसाठी माली टी ७२० जेपीयु आहे. फोनला १ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज असून ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. फोनला ८ एमपीचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा एलइडी फ्लॅश सह आहे. हा फोन ड्युअल सीम असून फोर जी व्होल्त सपोर्ट करतो.
फोनला स्मार्ट कि बोर्ड असून हा कि बोर्ड २२ प्रादेशिक भाषांना सपोर्ट करतो.
