नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी पाहण्यासाठी वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान पहा


हिमालयातील गंडगी नदीने वेढलेले एक आगळेवेगळे अभयारण्य बिहारमध्ये असून त्याचे नाव आहे वाल्मिकी राष्ट्रीय पार्क. बिहारच्या पश्चिम चम्पारण्य जिल्ह्याच्या उत्तर भागात नेपाल सीमेजवळचा हा छोटासा कसबा आहे. येथे लोकसंख्या कमी आणि वनक्षेत्र अधिक आहे. १९९० मध्ये या राष्ट्रीय अभयारण्याची स्थापना झाली आहे.


या अभयारण्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले दुर्मिळ प्राणी पाहता येतात. शिवालिक पर्वत रांगांच्या बाहेरच्या सीमेवर हे अभयारण्य आहे. येथे, चित्ते, एकशिंगी गेंडे, वाघ, लांडगे, भूकणारी हरणे, सांबर, चितळ, नीलगाई, अजगर, तरस, रानमांजरे, जंगली कुत्री पाहायला मिळतात.


सकाळी हे प्राणी बरेचदा दर्शन देतात. विविध रंगाची, आकाराची फुलपाखरे हे येथले आणखी एक वैशिष्ट आहे. विविध जातीचे अनेक पक्षी येथे दर्शन देतात. नोव्हेंबर ते मार्च हा सिझन येथे जाण्यासाठी उत्तम आहे.

Leave a Comment