सिरीन लॅब्ज आणतेय जगातला पहिला ब्लॉकचेन स्मार्टफोन


स्विझर्लंडची सिरीन लॅब्ज हि कंपनी जगातला पहिला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केलेला स्मार्टफोन नोव्हेंबर मध्ये बाजारात आणत असून या फोनचे नामकरण फिन्नी असे केले गेले आहे. या फोनसाठी कंपनीने फॉक्सकॉन बरोबर हँडसेट साठी करार केला आहे. या फोनची किंमत साधारण ९९९ अमेरिकी डॉलर म्हणजे ६७ हजार रुपये असेल आणि हा दोन इंची स्लायडर स्क्रीन स्मार्टफोन असेल असे झेडडीनेट च्या अहवालात म्हटले गेले आहे.

फोनची अन्य स्पेसिफिकेशन समजू शकलेली नसली तरी हा अँड्राईड ८.१ ओएस असलेला हॅकप्रुफ फोन असेल असे समजते. यात प्रोटेक्शन साठी इंट्रजन प्रोटेक्शन सिस्टीम (आयपीएस) वापर केला आहे. या फोनचा मुख्य उद्देश ब्लॉकचेन व्यवहार हा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने हिरे व्यापारी त्याच्या देवघेवीसाठी करतात. यामुळे देवघेव सुरक्षितपणे करता येते. तसेच बिटकॉइन सारख्या क्रीप्टोकरन्सी मध्येही व्यवहार करता येतात. या व्यवहारावर रिवॉर्ड पॉइंट मिळतात तेही क्रीप्टो करन्सी मध्ये बदलता येतात.

या कंपनीने काही वर्षापूर्वी सोलारीन स्मार्टफोन लाँच केला होता त्याची किंमत होती १४८०० डॉलर्स.